Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रअहो हे कास नव्हे कासवंड आहे…कासवंडच्या सड्यावर सप्तरंगांची उधळण ; पर्यटकांची पावले...

अहो हे कास नव्हे कासवंड आहे…कासवंडच्या सड्यावर सप्तरंगांची उधळण ; पर्यटकांची पावले पठाराकडे वळू लागली

भोसे : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. या पठाराची गुगलवर वेबसाईट शोधत पर्यटक येथे येत आहेत. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहे
येथील रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरदूरहून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. याबरोबरच विविध प्रकारचे पक्षी, फळे, प्राणी व सरपटणारे जीव येथे आढळून येतात. निसर्गाचा हा अ‌द्भुत ठेवा अनुभवण्यासाठी दूरदूरहून पर्यटक येथे येत आहेत. त्यामुळे या ठिकाणाला पर्यटनस्थळा म्हणून दर्जा द्यावा यासाठी तात्कालीन सरपंच, पर्यावरणप्रेमी रवींद्र गोळे, विनायक पवार, सखाराम चोरमले, सर्जेराव पवार सातत्याने मागणी करीत आहेत. सद्य:स्थितीला पाचगणी परिसरातील डोंगररांगा, पठारे विविध रानफुलांनी
बहरू लागली आहेत. याच पठाराच्या पूर्व दिशेस जमिनीत शंभर फूट खोल भुलभुलैय्या करणारी नैसर्गिक गुहांची तीन तासांची सफर आहे. या पांडवकालीन गुहेचा सफर करण्यासाठी स्थानिक नागरिकदेखील पर्यटकांना मदत करतात. परंतु, या गुहांमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने पर्यटकांना मोठ्या गैरसोयीता सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथे रस्त्यासह अन्य विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रतिक्रिया : रवींद्र गोळे माजी सरपंच
कास प्रमाणेच या ठिकाणी अनेक जातींची अनेक रंगांची फुले येथे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. ही निसर्ग संपदा या आणि मनसोक्त अनुभवा अशा मागणी बरोबरच प्रशासन व लोकप्रतीनिधीनी याकडे लक्ष देवून विविध निधीच्या माध्यमातून हा ठेवा जपणेबरोबरच पर्यटकांना अनुभवता यावा यासाठी उपयोजना कराव्यात अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे.
सोबत फोटो आहेत
कासवंड : अशा प्रकारची विविध रंगी फुले निसर्गप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करीत आहेत (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments