
प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्या,माजी नगरसेविका कै. सुनंदा राजेंद्र सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने दिनांक ५/१०/२०२४ रोजी रात्री दुःखद निधन झाले.दोन महिन्या पूर्वी त्यांचे पती राजेंद्र सूर्यवंशी यांचे निधन झाले, निधनाची बातमी समजतात सर्व महिला/ पुरुष शिवसैनिकां मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्ययात्रा आज दिनांक ६/१०/ २०२४ रहाते घर शास्त्रीनगर येथून दुपारी १ वाजता निघणार आहे धारावी हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते,अलीकडेच त्यांचे पती नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो.