मुंबई (शांताराम गुडेकर ) : पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी गावचे सुपुत्र सोपानदादा मोरे आणि कोतवाल रेववाडी गावचे सुपुत्र कीर्तनकार उत्तम महाराज जाधव यांना यंदाचा 2024 चां समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आदर्श रायगड या पाक्षिकाच्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सामाजिक , शैक्षणिक , क्रीडा पत्रकारिता , साहित्य आदी विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोपानदादा मोरे हे शेतकरी कुटुंबातून असून पारमार्थिक , शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक सामाजिक असे कार्य त्यांनी निष्ठेने पार पाडले आहे. गोलेगणी ग्रामपंचायत मध्ये अनेक गरजू विद्यार्थ्यांना जून महिन्यात शाळेय साहित्य ते वाटप करत आहेत. इतर विद्यार्थ्यां त्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. तर कीर्तनकार उत्तम महाराज जाधव हे उत्कृष्ट शिव व्याख्याते असून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि आताच्या काळाच्या गरजेवर ते समाजाला प्रबोधन करत आहेत. इतकेच नाही तर सामाजिक कार्यात देखील त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. तालुक्यातील या दोन रत्नांच्या कामाचा दाखला म्हणून आदर्श रायगड पाक्षिकाच्या वर्धापन दिनी त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सोपानदादा मोरे आणि उत्तम महाराज जाधव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES