मुंबई (शांताराम गुडेकर ) : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून शरदजी पवार गट यांच्या पक्षातून आणि महाविकास आघाडी मार्फत प्रशांत यादव यांना अधिकृत उमेदवारी उद्या -परवा जाहिर होण्याची शक्यता आहे.त्यांना सध्याचे मतदार संघातील चित्र पाहता शरदजी पवार यांची चिपळूणला सभा झाल्या पासून वाढता पाठिंबा मिळत आहे.त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.आज शहरी,ग्रामीण भागात त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.आज वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्स मार्फत त्यांनी घरा- घरात रोजगार निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.तरुण पिडीला त्यांच्या हाताला काम दिले आहे.गावा- गावातुन दुध डेरी बंद पडल्या होत्या. बंद पडलेल्या दुध डेरी यादव यांनी परत सुरु केल्या आहेत.आज प्रशांत यादव यांनी तरुण पीडीच्या हृदयात आपले घर केले आहे.आज त्यांच्या व्यवसायात दररोज सात हजार पेक्षा जास्त शेतकरी दुध डेरी वर दुध घालत आहेत.शेतकरी यांच्या दुधाला चांगला भावही मिळत आहे.आज गाव तेथे डेरी गाव तेथे तरुण वर्गला काम मिळेल अशी भावना निर्माण करून यादव यांनी तरुण पिडीला व्यवसायाकडे वळवले आहे. वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्स आणि तुतारी हे चिन्ह घरा -घरा पोचवले आहे.आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत.चिपळूणच्या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्तित होते.आपल्या आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा आणि तमाम जनतेचा विकास व्हावा असे या मतदार संघातील नागरिक यांची इच्छा आहे.इडी,सीबीआय आणि विविध धाडीपासून मराठी माणसांची सुटका व्हावी. विकास कामाना वेग यावा यासाठी प्रशांत यादव सारखा तरुण उमेदवार आमदार व्हावा अशी महाविकास आघाडीची प्रामाणिक इच्छा आहे.वरिष्ठ नेते एक -दोन दिवसात अधिकृत उमेदवारी यादव यांची महाविकास आघाडीतर्फे जाहीर होईल. महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे बैठक घेऊन दोन दिवसात उमेदवारी जाहीर करतीलच.पण आजचे निवडणूक विषयक वातावरण पाहता प्रशांत यादव यांचे पारडे जड आहे.
महाविकास आघाडीतर्फे चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून प्रशांत यादव यांचे नाव आघाडीवर, प्रशांत यादव यांना वाढता पाठिंबा
RELATED ARTICLES