मुंबई ( रमेश औताडे) : धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मतदार परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे हे राहणार असून उद्घाटक म्हणून राष्ट्रीय महासचिव उद्धव तायडे हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून बंलवत चावरीया ( वाल्मिकी समाज नेते मुंबई) सैय्यद सलिम बापू ( मराठवाडा प्रदेश) जाॅनसन जोसेफ ( अल्पसंख्याक नेते मुंबई) अँड अश्विनी कांबळे ( पच्छिम महाराष्ट्र) जयप्रकाश झोले ( आदिवासी नेते नाशिक विभाग) देवेंद्र बागडे ( राष्ट्रीय संघटक) प्रमुख वक्ते विकास काटे ( मुंबई) दिलिप कदम ( कोकण प्रदेश) अँड अमर चौरे ( पच्छिम महाराष्ट्र) छोटूलाल मोरे ( धुळे) धर्मा बागडे ( विदर्भ) हे राहणार आहेत.
स्वागताध्यक्ष प्रा.रमेश दुपारे वैशाली तभाने हे राहतील तसेच मेळाव्यात राज्यातील महिला मोर्चा, युवा मोर्चा, कामगार शेतकरी मोर्चा, विध्यार्थी मोर्चा चे जिल्हा तालुका प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे प्रदेश प्रसिद्ध आणि प्रसारण प्रमुख शाम बागुल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.