प्रतिनिधी(महेश कवडे) : शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येणार असून जय्यत तयारी सुरु असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात (शिवतीर्थावर)भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे. “सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडश्या पाडणार आहे.”असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे “शिवतीर्थावर” शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
