Thursday, September 4, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात भिमाई स्मारक उभारणीसाठी पाठपुरावा करणार -रामदास आठवले

साताऱ्यात भिमाई स्मारक उभारणीसाठी पाठपुरावा करणार -रामदास आठवले


सातारा(अजित जगताप)  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई यांचे भिमाई भूमीत स्मारक व्हावे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
मातोश्री भिमाई रामजी आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पहाणी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. माता भिमाई यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या जागेची पहाणी करताना सांगितले.
यावेळी रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी अध्यक्ष सौ . सीमाताई आठवले, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, राष्ट्रीय सरचिटणीस गौतम सोनवणे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व भिमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पार्थ पोळके, विजयराव ढमाळआणि अजित जगताप, आप्पा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
—————————————++
फोटो -साताऱ्यातील भिमाई स्मारकाबाबत माहिती घेताना रिपब्लिकन नेते रामदास आठवले व मान्यवर (छाया- निनाद जगताप ,सातारा)

    RELATED ARTICLES

    प्रतिक्रिया द्या

    कृपया आपली टिप्पणी द्या!
    कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

    Most Popular

    Recent Comments