Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रजातीच्या दाखल्याचा वनवास अखेर संपला... मजुराच्या मुलीला अखेर शिक्षण मिळणार; पत्रकार भणगे...

जातीच्या दाखल्याचा वनवास अखेर संपला… मजुराच्या मुलीला अखेर शिक्षण मिळणार; पत्रकार भणगे यांच्या प्रयत्नांना यश


प्रतिनिधी : कुमारी आसावरी अर्जुन होळकर घरची परिस्थिती अगदी हालाखीची असतानाही शिकण्याची जिद्द, आई वडील आगाशिवनगर मलकापूर येथे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. मुलगी ही शिक्षणासाठी आजोळी मौजे विठ्ठलवाडी गावात राहत आहे. अभ्यासाची आवड असल्यामुळे आणि चांगले मार्क्स पडत असल्यामुळे पुढील शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे हे समजल्यानंतर त्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करून ही तिच्या कुटुंबाला कागदपत्रा चा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही.
याची माहिती संबंधित कुटुंबाने सामाजिक कार्यकर्ते तसेच धगधगती मुंबई कराड तालुका प्रतिनिधी प्रताप भणगे यांना सांगितली, सदर माहिती मिळाल्यानंतर जातीच्या दाखल्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची शोध मोहीम चालू झाली. दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे कराड नगरपालिका, चाफळ, पाटण, पुसेसावळी, वडूज अश्या तीन तालुक्यात शोधून काढावी लागली. यासाठी जवळ जवळ एक महिना लागला, शासकीय व्यवस्थेतील अनेक चांगले वाईट अनुभव ही आले त्यात अनेक जणांचे सहकार्य लाभले यात विठ्ठलवाडी जि.प.प्रा.शाळेचे माजी मुख्याध्यापक दिनेश थोरात सर, पाटणचे मित्र वसंत लोहार सर, तुळसणचे मित्र श्रीधर नलवडे तसेच महेश मोरे अश्या अनेक लोकांचे सहकार्य दाखला मिळवण्यासाठी झाले. कोणतीही गोष्ट एक एकट्याने करणे शक्य नसते, परंतु अनेकांचे हात लागल्यावर ती अशक्य गोष्ट ही लवकर शक्य होते, ते म्हणतात ना “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” या म्हणी प्रमाणे एक ही पुरावा जवळ नसतानाही सर्व पुरावे जमा करण्यात मदत मिळाली आणि जे शक्य नव्हते ते शक्य झाले. आज मिळालेला दाखला कु आसावरी हिला देत असताना आसावरी चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद दिसून आला आणि तिला इथून पुढे हि तिच्या पुढील शिक्षणात अशाच प्रकारे यश मिळावे अश्या प्रकारच्या दाखला किंवा इतर कागदपत्र संबंधी कोणत्या ही समस्या असल्यास संपर्क करावा नक्कीच श्यक्य ती मदत करण्याचा प्रयत्न असेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments