Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसंजय राऊत म्हणजे घर कोंबडे,लोकांतून निवडून येऊन दाखवा - गिरीश महाजन

संजय राऊत म्हणजे घर कोंबडे,लोकांतून निवडून येऊन दाखवा – गिरीश महाजन

प्रतिनिधी : संजय राऊत यांना सांगा तुम्हाला माझं चॅलेंज आहे. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा पाच लाखाच्या वर लीड देईल. मागच्या वेळेस लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 65 हजाराचे लीड होतं.  यावेळेस पाच लाखाहून अधिक लीड दिली जाणार, मी तुमच्यासारखा असा घर कोंबडा नेता नाही. मी बाग देणारा कोंबडा नाहीये, कार्यकर्ता आहे. घरात बसून असा आरड ओरड मारत बसत नाही”, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन  यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांना खुलं आव्हान दिल आहे. 
जिथे तुमची जागा निवडून येईल तिथं उभे राहून दाखवा
गिरीश महाजन म्हणाले, माझी औकात महाराष्ट्राला माहित आहे. तुम्हाला सुद्धा माहित आहे. राऊत तुम्ही फार अशी बाग देऊ नका.  एखादी लोकसभा घ्या जी तुम्हाला सगळ्यात सोपी आहे. जिथे तुमची जागा निवडून येईल तिथं उभे राहून दाखवा. जनतेमध्ये निवडून येऊन दाखवा आमदार होऊन दाखवा, खासदार होऊन दाखवा. मग तुम्हाला तुमच्या औकात कळेल. माझी औकात काय काढता मी सात वेळेस निवडून आलेला आहे.  

गिरीश महाजन म्हणाले, माझा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध नाही. ते म्हणतात माझी पोहोच वरती एक दोन नंबरला आहे. पंतप्रधानांकडे आहे अमित भाईंकडे आहे. काल पण त्यांनी सांगितलं प्रवेश होतोय म्हणून त्यांची हॉट लाइन आहे.  ते मोठे नेते आहेत त्यामुळे खालच्या लोकांशी ते बोलत नाहीत, असा उपरोधित टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला. 
आमचे लोक कुठेही बंडखोरी  करणार नाहीत
मला वाटतं चर्चेतून सर्व प्रश्न सुटत असतात. आमचे ते कार्यकर्ते आहेत. शेवटी आम्ही सर्व एक आहोत. शिवसेना -राष्ट्रवादी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमच्यात कुठेही बंडखोरी होणार नाही, याची आम्ही काळजी घेतोय. आम्हाला विश्वास आहे की चर्चा झाल्यानंतर हे सर्व प्रश्न मार्गी लागतील. आमचे लोक कुठेही बंडखोरी  करणार नाहीत, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. हिंगोलीत दबावाचा प्रश्न नाही. सर्वे झालेले आहेत. जनमत जाणून घेतलेलं आहे. त्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल त्यानुसार उमेदवारी बदलली आहे. नवीन उमेदवार आमचा निवडून येईल यात कुठलेही शंका घ्यायचं कारण नाही. आम्ही दिलेल  नवीन दिलेला उमेदवार शंभर टक्के  निवडून येईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments