सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या२८८ सदस्यांच्या निवडणुक वारे वाहू लागलेले आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी व अपक्षांनी मोर्चा बांधणी केलेली आहे. प्रस्थापितांनी दुर्लक्षितपणा केल्यामुळे आता दुय्यम कार्यकर्ते खर्च भागवण्यासाठी भावी आमदारांची क्रेझ निर्माण करत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ असून पक्ष पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन शिवसेना दोन काँग्रेस एक व भाजप दोन असे पक्षीय बलाबल आहे. परंतु राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडी सर्व राजकीय घडी विस्कटलेली असून एकमेकांचे राजकीय शत्रू एकमेकांच्या गळाभेट घेत आहेत तर गळाभेट घेणारे एकमेकांचे राजकीय शत्रू बनलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी भव म्हणण्यापेक्षा जिरवा जिरवीचे राजकारण गतिमान होणार आहे. त्यामध्ये वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी काही रेडीमेड कार्यकर्ते भावी आमदार निर्माण करून खर्चाची व्यवस्था करत आहेत. त्यामुळे विकास कामांऐवजी भावी आमदार असे संबोधन अनेकांचे मनोरंजन केले जात आहे.
खरं म्हणजे भावी आमदार हे कधीच निवडणुकीत विजय होत नाहीत .हे सातारा जिल्ह्याने दाखवून दिले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाने एका रात्रीत काही कार्यकर्ते हे भावी आमदार म्हणून ओळखले जातात .परंतु ,त्यानंतर निवडणूक झाली की त्यांचे नाव सुद्धा कुणाच्या लक्षात राहत नाही. हे क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील दाखवून दिलेले आहे.
पूर्वी नेत्याच्या जीपमध्ये बसून निष्ठावंत कार्यकर्ते जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी येत होते. आता नेत्याच्या भेटीसाठी अनेक जण ताटकळल्याचे दिसून येत आहे. या भावी आमदार या शब्दामुळे अनेकांच्या घराची कौल सुद्धा विकावी लागलेले आहेत. भावी आमदारांचे अवस्था बिकट झाल्यामुळे एखाद्याला राजकारणात संपवायचा असेल तर भावी आमदार असा बॅनर फक्त लावण्याची जबाबदारी घेतली की, भावी आमदाराची घसरून सुरू होते. मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो.. अशा पद्धतीने आता सातारा जिल्ह्यात कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, माण- खटाव , पाटण,सातारा- जावळी, वाई- महाबळेश्वर- खंडाळा,विधानसभेमध्ये भावी आमदारांच्या मागे कार्यकर्ते हिंडत आहेत. भावी आमदारांची अवस्था बिकट होण्याची अनेक जण वाट पाहत आहेत. त्याची सुरुवात आतापासूनच झाले असल्याचे सातारा जिल्ह्यात दिसून येत आहे.
प्रस्थापितांच्या दुर्लक्षितपणाने साताऱ्यात दुय्यम कार्यकर्त्यांकडून भावी आमदारांची क्रेझ …
RELATED ARTICLES