मुंबई (शांताराम गुडेकर ) : परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा यांनी घाटकोपर येथील काजरोळकर सोसायटीमध्ये परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी भक्तीधाम सेवाश्रम ची स्थापना केली त्यांच्या माध्यमातून खूप असे समाजकार्य सुरू होते तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, व्यसनमुक्ती, प्रवचनकार, कीर्तनकार हे घडवले आहेत. तसेच अनेक शिष्यगण घडले की त्यांनी आपलं महाड पोलादपूर रायगड नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सांप्रदायाचे नाव उज्वल केलं सद्गुरू सीताराम स्वामी शेडगे बाबा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तीच परंपरा त्यांचे पुत्र उमेश महाराज शेडगे जपत आहे. हेच कार्य पाहून त्यांना २०२४ चा आदर्श रायगड वृत्तपत्र वृत्तवाहिनीचा आदर्श रायगड राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अंबरनाथ पूर्व येथील वीर बाजीप्रभू देशपांडे पंथ स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आले. तसेच समाज माध्यमातून ह भ प श्री उमेश महाराज शेडगे यांना प्रत्यक्षात, व्हाट्सअप, फेसबुक आणि भ्रमणध्वनी असे विविध माध्यमातून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.
उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES