Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रचर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी आझाद मैदानात मोर्चा; राज्यातून...

चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी आझाद मैदानात मोर्चा; राज्यातून मोठ्या प्रमाणात चर्मकार उपस्थित

प्रतिनिधी :  महाराष्ट्रामधील चर्मकार समाजाच्या अनेक मागण्या खुप दिवसाच्या प्रलंबीत आहेत. त्यामुळे चर्मकार समाज आर्थिक, सामाजीक, शैक्षणिक विकासापासुन वंचित राहिला आहे. या मागण्या मंजुर करण्यात याव्यात म्हणून वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्याचा काही उपयोग होताना दिसला नाही.याबाबत चमर्कार समाजाच्या शिस्टमंडळासोबत सह्याद्री अतिथगृह या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एक बैठकही झाली होती.त्यावेळी या सर्व मागण्या मान्यही केल्या होत्या परंतु त्याची अद्याप अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२४ रोजी चर्मकार समाजाच्या वतीने आझाद मैदान येथे प्रचंड मोर्चा काढण्यात आला व यामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने चर्मकार बांधव उपस्थित होते. यावेळी मागण्या मंजुर करुन चर्मकार समाजास न्याय द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा चर्मकार समाजाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे.

मागण्या :-

१) संत रोहिदास चमौद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरणे माफ करण्यात यावीत., २) संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरु करण्यासाठी १०० एकर जमीन व निधी त्वरीत देण्यात यावा, ३) संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी,४) संत रविदास कौशल्य विकास बार्टी प्रमाणे सुरु करुन बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे केंद्रे सुरु करण्यात यावी., ५) संत राहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास कर्ज प्रकरणासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करुन अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे त्वरित मंजुर करण्यात यावी, ६) चर्मकार समाजाचा आयोग सुरु करुन त्यावर अध्यक्ष नेमण्यात यावा, ७) संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे.८) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात असलेले कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरील कर्मचारी रद्द करुन चर्मकार समाजाचया मुलांना प्राधान्य देण्यात यावे.९) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला मुंबई येथे प्रशस्त असे मुख्य कार्यालय देण्यात यावे,१०) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने प्रलंबित असलेले सर्व कर्ज प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात यावेत.११) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला प्रत्येक जिल्ह्यात अद्यावत असे कार्यालय देऊन जिल्हा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. मुंबईसह राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावे.,१२) राज्यातील गटई कामगारांना गटई स्टॉलचे त्वरित वाटप करण्यात यावे.१३) चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृती त्वरित देण्यात यावी.,१४) राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये संत रविदास भवनासाठी जागा उपलब्ध करुन भवन बांधुन देण्यात यावे,१५) दोन लाखापर्यंतची कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावे, १७) संत रोहिदास विकास महामंडळाच्या कर्जाच्या जामीनदारा बाबतच्या जाचक अटी, १८) राष्ट्रीय चर्मकार महासंघ चर्मकार समाजाच्या सामाजिक आर्थिक उद्योग विकासासाठी गेल्या २८ वर्षापासुन सातत्याने महाराष्ट्रात कार्यरत आहे. तरी या राज्य महासंघासाठी मुंबई येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.,१८) संत रोहिदास चर्मोद्याग व चर्मकार विकास महामंडाळाची दुकाणी प्रत्येक जिल्ह्यात असावी जेने करुन महामंडळाने बनविलेला माल विकता येईल. अशा मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. मागण्याचे निवेदन देण्यात आले,या शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष,माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप,राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, डॉ शांताराम कारंडे,राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे,राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार,राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरोज बिसोरे,महिला प्रदेशाध्यक्ष डॉ स्नेहल आंबेकर,मुंबई अध्यक्ष राजू नेटके,यांच्यासह अनेक मान्यवर होते.राज्यातून मोठ्या प्रमाणात चर्मकार बांधव या आठवण मोर्चात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments