सातारा(अजित जगताप) : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र व शेतकऱ्यांऐवजी काही संचालकांची श्रीमंत बँक असे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार क्षेत्रात वर्णन केले जाते. ती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता सोहळा बुधवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सातारा सैनिक स्कूल मैदानावर होत आहे.
या कार्यक्रमाला शेतकऱ्यांऐवजी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हा अमृत महोत्सव बँकेच्या सांगता सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या गर्दी होणार की सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट२०२३ ते १५ ऑगस्ट २०२४ या काळात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने गौरवशाली अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. या निमित्ताने अमृत महोत्सव सांगता सोहळा बुधवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील ,उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अध्यक्ष विद्याधर अनास्कर ,आमदार -, बँकेचे सर्व संचालक यांना प्रमुख उपस्थिती व पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे.
या कार्यक्रमासाठी बँकेचे शेतकरी सभासद ,माजी संचालक, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, सचिव, अधिकारी, सेवक, ठेवेदार,, कर्जदार या सर्वांना निमंत्रण पत्रिका खास दूतामार्फत पाठवण्यात आले आहेत. राज्यात महायुतीच्या घटक पक्षातील मान्यवर कार्यकर्त्यांनाही खास बाब म्हणून निमंत्रण देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष व खा.नितीनकाका पाटील व उपाध्यक्ष अनिल देसाई तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकारी- कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.
