Saturday, August 30, 2025
घरमहाराष्ट्रपर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीबांबू शेती ठरणार कल्पवृक्ष - पाशा पटेल

पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीबांबू शेती ठरणार कल्पवृक्ष – पाशा पटेल

मुंबई (रमेश औताडे) : ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार असून बांबू आता कल्पवृक्ष ठरणार आहे. शेतकरी आत्महत्या व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही बांबू शेती फायद्याची ठरणार आहे अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शाश्वत आणि पर्यावरणस्नेही भविष्यातील गृहनिर्माण उपक्रमासाठी ग्रीन महाराष्ट्र साठी नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको), महाराष्ट्रा तर्फे भारतातील सर्वांत मोठ्या रियल इस्टेट प्रॉपर्टी एक्स्पो ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत जिओ बर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी बांद्रा येथे करण्यात येत असून या मध्ये बांबू हरीत गृह प्रदर्शन होत असून हरित घरे कशी असतील हे जनतेला माहिती होईल.असे नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी सांगितले

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर (एमओयू) हस्ताक्षर करण्यात येणार आहे. नरेडको ने फिनिक्स फाऊन्डेशन संस्था या प्रसिध्द कृषीतज्ञ आणि पर्यावरणाशी सुसंगत पीक म्हणून बांबूचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणारे पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखालील संस्थे बरोबर भागीदारी केली आहे. असे नरेडको चे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले.

वातावरण बदलाशी मुकाबला करत असतांना रिअल इस्टेट क्षेत्र हे मोठे योगदान देत असते, कारण ते बांबू सारख्या वस्तूंचा उपयोग हा बांधकाम प्रकल्पांमध्ये परंपरागत गोष्टींच्या ऐवजी करु शकतात ज्यामुळे वातावरणावर सकारात्मक परिणाम होऊन तापमानाच्या समस्येवर उपाय केला जाऊ शकेल असे
नरेडको सचिव राजेश दोशी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments