सातारा(अजित जगताप) :सामाजिक जाणीव ठेवून कार्यरत राहणाऱ्या सातारा शहरातील संजीवनी बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी सामाजिक कार्याचे रोपट लावले होते. आता त्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याची भूमिका सर्वांच्या सहकार्यातून त्यांनी घेतली आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान गरजेचे नव्हे तर महत्त्वाचे आहे. आपल्या एक रुपयाच्या संदेशाने गरिबाला पोटभर अन्न देण्याची व्यवस्था या संस्थेमार्फत होत आहे. आणि यापुढे होत राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून सुद्धा या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. ही खंत मनाशी बाळगून आठ ते दहा वर्षांपूर्वी एक तरुण आंदोलनाने पेटून उठला. आपला चांगला चाललेला व्यवसाय थोडा विसरून सामाजिक जाणीव ठेवून साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी आंदोलनातून रस्त्यावर उतरला. आज जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या भिंती उभ्या राहतात. तेव्हा सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांच्या कामाचे चीज झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. एवढ्यावरच श्री कांबळे थांबले नाहीत तर त्यांनी मोफत अंत्यविधी साहित्य वाटप तसेच गरजूंना मोफत भोजन व भाजीपाला , कपडे , फळे , पाणी वाटप तसेच नैसर्गिक आपत्ती ज्यांच्यावर येईल त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. हा लढाऊ व सामाजिक जाण असणारा व्यक्ती खरं म्हणजे राजकारणापासून अलिप्त असल्यामुळेच हे यश दाखवून देत आहे. निराधार व अनाथ मुलांसाठी तसेच मनोरुग्ण, बेवारस वयोवृद्ध ,निराधार लोकांना आधार म्हणजे रवींद्र कांबळे असे सातारा जिल्ह्यात समीकरण झालेले आहे.
अनाथ मुलींचा विवाह सोहळा म्हणजे आपल्यासाठी पाठचा भाऊ असून खऱ्या अर्थाने त्यावेळी पासून आज पर्यंत लाडकी बहिण योजना सुरू आहे .असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी प्रत्येक दवाखान्यामध्ये दर पत्रक लावणे तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये सिटीस्कॅन मशीन बसवणे याचबरोबर सातारा शहरातील भूमिगत विद्युत वाहिनी धोकादायक विद्युत पूल तारा डीपी बदलणे शेतकऱ्यांना वीज बाब करणे यासाठी सुद्धा अनेकदा आंदोलन केलेले आहे. त्याला यश मिळाल्यामुळेच खऱ्या अर्थाने त्याचा फायदा समाजाला होत आहे.
आपल्या उद्योग व्यवसायातून खूप मोठी क्रांती केली. पण, त्याचा अभिमान न बाळगता जे काय कमविले आहे. त्याचे हिस्सेदार समाज सुद्धा आहे. यासाठी आता समाजाने सुद्धा आपली भूमिका पार पाडणे गरजेचे आहे. दानशूर व्यक्ती व समाजासाठी अल्प मदत ही सुद्धा गौरवस्पद बाब ठरणार आहे.
सध्या समाज माध्यमांमध्ये क्रांती झाली असून आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल यंत्र आहे. दर महिन्याला आपण रिचार्ज करतो आणि काही मंडळी हे दररोज सकाळी आपल्या मोबाईल मधील परिचित लोकांना शुभ संदेश देतात. सण, वाढदिवस, यश व विजय तसेच अनेक इतर शुभकार्याच्या वेळेला संदेश पाठवतात. शुभेच्छा योजना म्हणजे थेट भांडवलदारांना सहकार्य करणे. असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. पण आपण जर दररोज आपला एक रुपया या सामाजिक कार्याला दिला तर खऱ्या अर्थाने आपले शुभ संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे ते सुद्धा अनुकरण करतील.