प्रतिनिधी : विरोधक मागील गोष्टी मुद्दाम व्हायरल करतील,तरी माझी कराड दक्षिण मधील सर्व काँग्रेस कार्यकर्ते,रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे.आपण याकडे दुर्लक्ष करावे,स्वर्गीय विलास काका यांचे जुने विडीओ व्हायरल होणार,मला खात्री आहे,हे विरोधक नक्कीच करतील,करण त्यांच्याकडे सध्या कोणतेच मुद्दे नाहीत,पराभव होणार याची चाहूल त्यांना आहे,त्यामुळे त्यांचे हे उद्योग आपण ओळखले पाहिजेत,जे आजतागायात कधीच कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत,ते ज्या पक्षात आहेत,तेथे तरी राहतील का ? हा प्रश्न निर्माण होत आहे. आमचे मतभेद होते, ते पूर्वी आता नाहीत,मला पाठीमागे जायचे नाही,आता आपल्याला पुढे काय करायचे आहे,यावरती प्रकाश टाकून आपण पुढील दिशा ठरवणार आहे.गेली ३५ वर्षे स्वर्गीय विलास काकांनी जो विकासाचा पाया रचला,त्याला आजही तोड नाही,प्रत्येक व्यक्तीशी नाळ जोडली,मुंबईतील चाकरमानी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांची होती. माथाडी कामगार कायदा असो,की,एकादा पाणी प्रश्न तो त्यांनी मनावर घेतला तर तो पूर्णत्वास कसा घेऊन जात होते,याबाबत आपल्याला कल्पना आहेच,

काँग्रेस पक्षाचे विचार हे गरिब घटकाला न्याय देणारे आहेत.या पक्षाशी आम्ही आजही प्रामाणिक आहे. आणि पुढे ही राहणार यामध्ये शंका नाही.कार्यकर्त्यांनी फक्त पुढील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जो प्रतिसाद आपण या कार्यक्रमाला दिला आहे.तोच मतदानावेळी गावी येऊन आपल्याला दाखवायचे आहे,१९५२ पासून यशवंतराव मोहिते यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला निर्माण केला तो वारसा पुढे स्वर्गीय विलास काकांनी १९८० पासून पुढे ३५ वर्षे अबाधित ठेवला आहे,आता येथे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण ही धुरा सांभाळत आहेत.कराड दक्षिण हा कॉंग्रेसचाच बालेकिल्ला पुढे राहिला पाहिजे, आम्ही आपल्या प्रत्येक गावातील विकासासाठी कटिबद्ध आहोत,प्रचंड असा विकासनिधी आपल्या भागात आला आहे,यापुढे तो येणार आहे.याबद्दल तिळमात्र शंका नसेल.पक्ष आणि संघटना यामध्ये फरक असला तरी संघटनेशिवाय अनेक गोष्टी साध्य होत नाहीत.म्हणूनच स्वर्गीय काकांनी ‘रयत संघटना स्थापन केली.या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था,बाजार समिती मार्केट विभाग असो यामध्ये महत्वाची भूमिका ही संघटना सांभाळेल, आणि याच माध्यमातून पक्षाची ताकद वाढली जाणार आहे. पृथ्वीराज बाबांना प्रचंड मताधिक्य देऊन आपण त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवणार आहोत,यासाठी आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे असेल असे शेवटी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड उदयसिंह पाटील दादा यानी आपल्या तडाकेबाज भाषणात आपले मत व्यक्त केले.ते कराड दक्षिण मधील कुटूंबाच्या स्नेह मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या भाषणाचे जेष्ठ नेते उल्हास दादा पवार यांनी देखील कौतुक केले.