
प्रतिनिधी(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना ग्रामीण साठी ७१० चे उद्दिष्ट होते त्यापैकी जागा असणारे व घरकुल बांधकाम सुरू करण्यास इच्छुक असणारे ५२१ लाभार्थीना मंजुरी देण्यात आली आहे. असे प्रस्ताविक करताना विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी सांगितले तसेच मंजूर घरकुल ४५ दिवसात पूर्ण करून गृहप्रवेश करावे असे आवाहन केले. अक्षय पाटील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी घरकुल बांधकाम विषयक मार्गदर्शन करून हप्ते वितरण बाबत लाभार्थीना माहिती दिली. युवराज गायकवाड ग्रामरोजगार सेवक यांनी घरकुल बांधकाम सुरू असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजना चे मस्टर व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित संदेश कदम ऑपरेटर घरकुल व गणेश मोरे उपस्थित होते. आभार श्रीमती खापे यांनी मानले..