
प्रतिनिधी(भिमराव धुळप) : वाढती बेरोजगारी,महागाई,पेट्रोल,डिझेल,खाद्यतेलाचे वाढवलेले भाव,महिलांवरील अत्याचार,संविधान बदलण्याची भाषा,शेतकऱ्यांच्या पिकाला मिळत नसलेला हमीभाव,कांद्यावरील निर्यातबंधीमुळे जनतेच्या मनात चीड निर्माण झाल्यामुळे जसे लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव झाला असाच पराभव विधानसभेला महायुती सरकारचा होणार आणि राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण(बाबा) यांनी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात कराड दक्षिणच्या स्नेहमेळाव्यात बोलताना केले.यावेळी माजी राज्यगृहमंत्री सतेज पाटील,उल्हासदादा पवार,भाई जगताप,महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड उदयसिह दादा पाटील,मनोहर शिंदे,अनिल कौशिक,अजित पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी संपूर्ण सभागृह खचाखच भरून बाहेर स्क्रीन लावण्यात आली होती.तेथेही तितकीच लोक उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणाच्या सुरुवातीला
समस्त कराड दक्षिण मधील उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले.माझ्या आजपर्यंतच्या नवी मुंबईतील कार्यक्रमात अशी उपस्थिती पाहिली नाही,असे उद्गगार काढले,व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्या सर्वांचे आभार मानले. पुढे त्यांनी आपल्या भाषणात मोदी व मिंद्ये सरकारचा खरपूस समाचार घेतला.यावेळी उद्योजक दीपक लोखंडे आणि मित्र परिवारातर्फे पृथ्वीराज चव्हाण यांचा गुलाबाचा हार घालून यथोचित सन्मान केला.
यावेळी उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे,आमचे वैचारिक मतभेद होते,पण पक्षाचे विचार एक असल्यामुळे विरोधक आपल्याला नको त्या मागील क्लिप दाखवतील,खोटा प्रचार करतील,आमिषे दाखवतील त्याला कराड दक्षिणमधील नागरिकांनी भुलू नये.कराड दक्षिण हा १९५२ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे,आणि तो पुढेही कॉंग्रेचाच बालेकिल्ला असेल असे आपले मत मांडले.माजी राज्य गृहमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर शैलीत विरोधकांचा समाचार घेतला व काका-बाबा एकत्र आणण्यासाठी माझे व उदयसिंह दादांच्या प्रयत्नाला यश मिळाले हे माझे भाग्य समजतो,असे सांगितले.आमदार भाई जगताप यांनी माथाडी कामगार कायद्या बंद करण्याचे षडयंत्र हे मिंद्ये फसनविस सरकार करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.कामगार कायदा आणि सरकारच्या योजना या फक्त पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आहेत.याची आठवण करून देत सरकारवर सडकून टीका केली.यावेळी उल्हास पवार यांचेही भाषण प्रभावशाली झाले.आपल्या नेहमीच्या शैलीत अजित पाटील चिखलीकर यांनी भोसले घरण्याचा समाचार घेतला.यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाला कराड दक्षिण मतदार संघातील मुंबईस्थित चाकरमानी मोठया संख्येने उपस्थित होते.प्रत्येक गावातून लोक आलेले होते,सभागृह खचाखच भरले होते,तेवढीच माणसे बाहेर उपस्थित होते.यावेळी एकच चर्चचालू होती,हा आजचा मेळावा हा विजयी मेळावाच आहे.