
प्रतिनिधी(।आहेस कवडे) : संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेला, समाजसेवा अंतर्गत सामाजिक कार्यात अग्रेसर, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, वैद्यकीय मदत, गरीब गरजवंतांना सहकार्य करणारा संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय समाजसेवा अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल महाराष्ट्रात नावलौकिक असलेला, व्हाट्सअप ग्रुप “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या ग्रुपला पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट समाजभूषण २०२४ पुरस्कार देऊन “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या ग्रुपचे संस्थापक, संचालक श्री.संतोष पाटील साहेब आणि त्यांच्या ग्रुपला सन्मानित करण्यात आले यावेळी ग्रुपचे अध्यक्ष, खजिनदार, सल्लागार तसेच ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.