Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रलहान मुलांच्या कर्करोग जनजागृतीसाठी पदयात्रा

लहान मुलांच्या कर्करोग जनजागृतीसाठी पदयात्रा

मुंबई (रमेश औताडे) : लहान मुलांमधील वाढता कर्करोग रोखण्याची नितांत गरज आहे. बदलती जीवनशैली व आहार विहाराचे बिघडले संतुलन पाहता या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. असे मत व्यक्त करत निरू फाऊंडेशनच्या अध्यक्षा काजल वाघेला यांनी मुंबई नरिमन पॉइंट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपर्यंत विद्यार्थी जनजागृती पदयात्रा फेरी काढली.

या जनजागृती पदयात्रे मध्ये सुमारे आठ शाळांमधील एन एस एस चे विद्यार्थी व गृहलक्ष्मी मिस इंडिया डॉ. फरजाना लकडावाला यांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी कर्करोगाने पीडित मुलांना जवळ घेत मायेचा ओलावा दिला. कॅन्सरग्रस्त मुलांसाठी नेहमी काम करणाऱ्या नीरू फाउंडेशनच्या अध्यक्षा काजल वाघेला यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते. मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे अध्यक्ष राहुल रामुगडे व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments