Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रडाॅ.संदीप डाकवे यांच्या कर्तृत्वाचा राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मान

डाॅ.संदीप डाकवे यांच्या कर्तृत्वाचा राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मान


मुंबई : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांच्या कर्तृत्वाचा नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळयात सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे, कृषि आयुक्त रविंद्र निबवडे भा.प्र.से., कृषि सचिव जयश्री भोज भा.प्र.से, व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत डॉ.संदीप डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आले. याप्रसंगी डॉ.संदीप डाकवे यांची आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, मुले चि.स्पंदन, कु.सांची आणि भाची कु.अक्षता निवडूंगे, पुजा निकम, सुनिल पवार, जनार्दन सुतार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रुपये 1 लाख 20 हजार, मानपत्र, मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्कार वितरण सोहळयात राज्यपाल सी. पी. सुब्रमण्यम उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कृषिविषयक बातम्या, शेतकरी यशोगाथा, कृषि योजना प्रसारासाठी स्वतःची प्रकाशने, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून राबवलेले उपक्रम, यासोबतच विविध समाज माध्यमांचा वापर प्रभावीपणे करत लिखाण केले होते. याची दखल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय यांच्यावतीने घेवून कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर केला आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ऍड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा संतोषकुमार बरकडे, कृषि विकास अधिकारी जि.प.सातारा विजय माईनकर, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे, तंत्र अधिकारी (विस्तार) जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा समीर पवार, कृषि सहायक प्रमोद गाढवे, कृषि सहाय्यक गणेश सावंत, कृषी सहाय्यक प्रदीप मराठे, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, वांगव्हॅली पत्रकार संघ, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री भोज भा.प्र.से.यांनी केले.

चौकट : पुरस्कार मिळाल्याचा आंनद पण वडिलांची उणीव : डाॅ.संदीप डाकवे
माझे वडील राजाराम डाकवे यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेती आणि मातीशी अखंड नाते जपले होते. या पुरस्कारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मला मिळालेला वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मी त्यांना समर्पित केला असून पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे पण तो स्वीकारताना वडीलांची उणीव जाणवतेय अशी भावनिक प्रतिक्रिया शेतीमित्र पुरस्कार प्राप्त डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments