प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून गावागावात रात्रीच्या वेळेला दिसणाऱ्या ड्रोनच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठी चर्चा होती. शेतशिवारात घराच्या छतावर रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. पण आता या ड्रोनच्या फेऱ्यांचा उलगडा झाला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात उडणारे ड्रोन सर्वे करण्यासाठी उडवल्याचं समोर आलंय. दिल्लीतील एका खाजगी कंपनीकडून ड्रोन द्वारे सर्वे करण्यात येतोय. यासाठी पोलिसांनी लेखी परवानगीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता ड्रोन दिसला तर घाबरू नका असे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.
गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरटा वाढल्या होत्या. घरावर शेतावर अचानक एखादा ड्रोन येऊन निघून जायचा. हा ड्रोन नक्की कोण उडवताय किंवा कुठून आला आणि कशासाठी आला हे माहीत नसल्याने नागरिक धास्तावले होते. गावात चोऱ्याही वाढल्याने चोरीसाठीच या ड्रोन चा वापर होतोय अशी शंका बळवली होती. पण आता रात्री अपरात्री उडणाऱ्या या ड्रोन नाट्यावर पोलिसांनीच पडदा टाकला आहे.

पोलिसांनी काय केला खुलासा?
राज्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये काही ठराविक गावांमध्ये द्रोनद्वारे शेती सर्वेक्षण करण्याकरता फोटो व शॉर्ट व्हिडिओ चित्रीकरण होणार होते. यासाठी पोलीस विभागाकडून दिल्लीतील खाजगी कंपनीला परवानगीही देण्यात आली होती. या परवानगी पत्रानुसार काही अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात त्यामुळे हे चित्रे करण करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांमध्ये सर्वेक्षण करण्याकरता ड्रोन उडत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.