
27 सप्टेंबर 2024 रोजी, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी, समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल्डच्या सहकार्याने, विविध दिव्यांग आणि वंचित नोकरी शोधणाऱ्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने एक समावेशक रोजगार मेळाळा यशस्वीपणे आयोजित केला. या कार्यक्रमाला विविध शैक्षणिक पार्श्वभूमीतील ४४५ सहभागींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
प्राचार्य डॉ. शुभदा नायक यांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याने या रोजगार मेळाव्याचे नेतृत्व उपप्राचार्य डॉ. राजश्री घोरपडे, प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. हर्षद जाधव आणि प्लेसमेंट ऑफिसर कु. लतिका दास यांनी केले. समर्थनम ट्रस्टचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र विभागीय प्रमुख जितेंद्र कर्णिक आणि उत्तर कर्नाटक विभागीय प्रमुख कृष्णा यांनी केले, तर बार्कलेजचे प्रतिनिधित्व ओंकार जाधव, सहायक उपाध्यक्ष आणि आदित्य वाळुंजकर यांनी केले.
या जॉब फेअरमध्ये 25 नामांकित कंपन्यांचा सहभाग होता, ज्यामध्ये विविध दिव्यांग उमेदवारांच्या अद्वितीय कौशल्य संचानुसार विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. औपचारिक उद्घाटनानंतर, दिवसभर मुलाखती घेण्यात आल्या, ज्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना संभाव्य नियुक्तीपर्यंत थेट प्रवेश मिळाला.