प्रतिनिधी : महाभारतातील दानशूर कर्णाच्या कथा भरपूर ऐकल्या असतील, पण कलियुगात कर्ण भेटणे दुर्मिळच..
प्रसंग आहे कोल्हापूर वारणा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील, मागील गळीत हंगामात एक मार्चनंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऊस पाठवला असेल अशा शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉ द्वारे बुलेट दुचाकी बक्षीस देण्याचे कारखान्याने जाहीर केले होते.
त्याप्रमाणे सर्व सभासद शेतकऱ्यांसमोर एका चिमुकलीच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला व नाव आले काकासाहेब चव्हाण यांचे. कारखान्याचे सर्व्हे सर्व माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते चावी प्रदान करते वेळी काका चव्हाण यांनी कोरे यांच्या कानात जाऊन सांगितले की,
साहेब, ही गाडी मला नको. आपण हा ड्रॉ परत काढावा व एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर ही बुलेट मिळाली तर तो आनंद माझ्यासाठी मला बुलेट मिळाल्यापेक्षा मोठा असेल.
हे शब्द ऐकताच कोरे यांनी पाठीवर थाप टाकत काका तुम्हीच हे अनाउन्स करा असे सांगितले. काकासाहेबांनी ही बुलेट मला नको असे सर्वांसमोर जाहीर केले व तो ड्रॉ परत काढला. ती बुलेट भादोले गावातील आप्पासो पाटील या शेतकऱ्याला मिळाली.
दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीची बुलेट क्षणात नको म्हणणारा अवलिया म्हणजे कलियुगातील कर्ण काकासाहेब चव्हाण. आणि असा मित्र माझा जिवलग प्राणसखा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे त्यांचे मित्र सचिन कदम यांनी सांगितले.