मुंबई (रमेश औताडे) : अनेक दिवसांपासून बांग्लादेशातील राजकीय घडामोडीचा फायदा घेत बांग्लादेशातील अल्पसंख्य असणाऱ्या शांतीप्रिय बौद्ध धम्मीयांवर अमानुषपणे तेथील धनदांडगे अमानुषपणे अन्याय अत्याचार करित आहेत.बौद्धांची घरे, दुकाने, उद्योगधंदे जाळपोळ करून नष्ट करण्यात आली आहेत. अनेकांची निघृतपणे हत्या करून बौद्धांची विहारे, स्तुप ध्यान केंद्रे जाळपोळ करून तर काही जमीनदोस्त करून नष्ट करण्यात आली आहेत. बौद्धांच्या जमीनी बळकावून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
भिक्खू संघ मुंबई च्या वतीने भन्ते के आर लामाजी, भदन्त शांतीरत्न थेरो, बौद्ध उपासक रवी गरुड, जय भीम आर्मी चे अध्यक्ष नितीन भाऊ मोरे तसेच उपासक उपासिका महासंघ तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
बांगला देशातील पर्वतीय परिसरात राहणाऱ्या अल्पसंख्य बौद्धांवर जाणीवपूर्वक, गुंडांनी आर्मीच्या सहाय्याने बौध्दांवर सशस्त्र हल्ला करून अनेकांना मारून टाकले. या घटनेत अनेक जखमीही झाले. त्यांची साधन संपत्ती बळकावळ्यात आली जमीनी बळकाविण्यात आल्या. गांवे नष्ट करण्यात आली ज्यावर परंपरागत बौध्द धम्मीयांचा अधिकार होता. बांग्ला देशात असणारा अल्पसंख्य बौध्द अनुयायी प्रचंड मानसिक दबावात आणि भितीमध्ये आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे बांग्लादेशातील बौध्दांचे जीवन संकटात आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात भन्ते के आर लामाजी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनात करण्यात आले.