प्रतिनिधी(मंगेश कवडे) : लोकल ट्रेनचा विस्तार अधिक वेगाने करण्यात येत आहे. मुंबई उपनगरातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)3 अंतर्गंत पनवेल ते कर्जत दरम्यान 29.6 किमीची नवी मार्गिका तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे 56 टक्के काम सुरू झाले आहे. कर्जत-पनवेल या नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यांमध्ये खडीरहित रूळ टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
