सातारा(अजित जगताप) : गाव गाड्यातील सेवेकरी म्हणजे विविध प्रकारच्या कामांमुळे जात निर्माण झाली ते ओबीसी बांधव आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी
ओबीसी संघटनेचे लढाऊ नायक प्राध्यापक लक्ष्मण हाके, कायदे तज्ञ मंगेश ससाणे व नवनाथ वाघमारे यांचे वडीगोद्री व अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ओबीसी संघटना व सातारा शहर,ग्रामीण भागातील ओबीसी बांधव सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. याबद्दल ओबीसी योद्धा अनिल लोहार व बबन झोरे यांनी अमर उपोषण सुरू केले आहे. त्यांना आता संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एसी ओबीसी व इतर पुरोगामी संघटना व जातीचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत निजामी कुणबी दाखले ५७ लाख दिले असून त्यामध्ये अधिक भर म्हणून मराठा समाजाच्या सगे सोयऱ्यांचा त्यामध्ये समावेश करण्याचा डाव आखला जात आहे. हे सर्व बोगस दाखले रद्द करावे. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ओबीसी समाज एकवटलेला आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातही ओ.बी.सी. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली असून गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्हा ओबीसी संघटना संघर्ष करत आहेत .यासाठी अमर उपोषण सुरू असून नैतिकता म्हणून ओ.बी.सी. समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिलेला आहे.
आपल्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष संघटना यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे . आतापर्यंत बाळकृष्ण देसाई ,मारुती जानकर, उद्धव कर्णे ,नारायण सुतार, चंद्रकांत खंडाईत, अमर गायकवाड, संजय नित्यनवरे, सुहास मोरे , सुहास काशीद, दगडू सकपाळ, कैलास जमदाडे , ऍड सुधीर ससाणे, दयानंद शीलवंत, वैभव गवळी, हौसेराव धुमाळ, मुरलीधर पवार, यांच्यासोबतच दिलीप जगताप, आनंदा पावसकर, जयसिंग कुंभार, सुरेश कोरडे ,अरुण वरगंठे ,सुनील यादव, वैभव गवळी, प्रकाश फरांदे ,प्रवीण गुरव, विठ्ठल कदम व बाल योद्धा मल्हार जानकर आदी मान्यवरांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे.
विशेष बाब म्हणजे सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या विविध मागणसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या महामोर्चातील बी.सी., ओ.बी.सी. ,अल्पसंख्यांक व पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
