मुंबई (रमेश औताडे) : जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जनतेची मी एक दशकाहून अधिक काळ सेवा करत आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने मला तिकीट दिले तर माझा या जागेवर विजय पक्का आहे. पक्षाने तिकीट दिले नाही तरी जनतेच्या आग्रहासाठी निवडणूक लढवणार. अशी माहिती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्रनाथ ठाकूर
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तयारीला लागले आहेत.
पक्षाने मला तिकीट दिले तर माझा या जागेवर विजय पक्का आहे, असा विश्वास व्यक्त करत ते यावेळी म्हणाले,
जोगेश्वरी पूर्व विधानसभेत १५ वर्षांपासून कावड यात्रा, राम कथा, रुद्राभिषेक, गरजूंना मदत करण्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम केले आहेत. आरोग्य शिक्षण रोजगार मेळावे आदी विविध समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत.