मुंबई (रमेश औताडे) : जुने मोबाईल, चार्जर, हेडफोन, पावर बँक, टी व्हि, पंखे, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जुनी झाल्यावर कचऱ्यात फेकली जातात. मात्र हाच कचरा आता पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करत आहे. यासाठी “जनरेशन ग्रीन” अभियान खारीचा वाटा उचलून ग्लोबल वॉर्मिग साठी हातभार लावेल असा विश्वास
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

ए आय सी टी ई आणि ओपो इंडिया तसेच सेंट झेवियर्स कॉलेज यांनी मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास व ओपो इंडिया प्रमुख राकेश भारद्वाज , सेंट झेवियर्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
शाश्वत जगासाठी पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुणांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी ग्रीन स्कील व इंटर्नशिपच्या माध्यमातून पाच हजार विद्यार्थी “जनरेशन ग्रीन” च्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाले आहेत. याचा मला अभिमान आहे असे प्रमुख पाहुणे म्हणून, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास यावेळी म्हणाले.