कराड( प्रतिनिधी) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या व त्यांचे आमरण उपोषण थांबवावे या मागणीसाठी कराड येथे भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ,या आंदोलनाची दखल तहसीलदार कल्पना ढवळे यांनी घेतली व सदर आंदोलनाच्या निवेदनाच्या मागणीचे पत्र देखील स्वीकारले ,यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे दादा जिंदाबाद,त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले आंदोलन असेल , ज्यामध्ये राज्य सरकार, सत्ताधारी पक्ष व विरोधातील सर्व पक्ष यांच्या विरोधात घोषणा देऊन हे सर्व नालायक आहेत मराठा आरक्षण देत नाहीत त्यांचा देखील निषेध करण्यात आला .
