मुंबई (शांताराम गुडेकर ) : निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत कोकणातही सध्या पवारांच्या सभेने वातावरण तापवल आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शनिवारी चिपळूण येथे सभा झाल्यानंतर पाठोपाठ सोमवारी झालेल्या थोरल्या पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडला आहे त्यामुळे
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणातपवारांच्या सभेने वारे फिरले आहे.अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर
निकम यांना घेरण्यासाठी दस्त्रखुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने
कोकणातले वारं फिरलं आहे.मतदारसंघाचे संभाव्य
उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी
सभा घेतली.मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या विधानसभा निवडणुकीत
चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत थोरल्या पवारांनी दिले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा सुरु झाल्या असून चिपळूणमधील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या सभेत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या सभेत बोलताना त्यांनी बऱ्याच वर्षांनी चिपळूण मध्ये आल्याचा आनंद होत असल्याचा आवर्जून उल्लेख करत प्रशांत यादव यांच्यासारखे कर्तृत्ववान तरूण नेतृत्व चिपळूणमध्ये उदयास येत आहे.अशा तरूण नेतृत्वाला संधी मिळणे गरजेचे आहे.असा खास उल्लेख करत शरद पवार यांनी प्रशांत यादव यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.त्याचबरोबर प्रशांत यादव यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा,असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.सत्तेचा वापर योग्यरित्या केला गेला पाहिजे.देशात परिवर्तनाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.
प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा.शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन
RELATED ARTICLES