Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रवर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स...

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनलतर्फे विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य वाटप


मुंबई (शांताराम गुडेकर ) : वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.चे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश जी सकुंडे,मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे यांच्या आदेशानुसार शनिवार दि.२१/९/२०२४ रोजी श्री सिद्धी विनायक कृपा बिल्डिंग पटागणं न्यू प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे प्रमुख पाहुणे माजी महापौर श्री.महादेव देवळे यांच्या शुभहस्ते व विभाग प्रमुख श्री.महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व कंपास पेटी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास मा.महापौर देवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच श्री.महेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास WHRAF चे जनरल सेक्रेटरी श्री. अमोल वंजारे,महाराष्ट्र सचिव सौ.ज्योती ताई भोसले,अध्यक्ष मीरा भाईंदर श्री.स्टिव्हन कार्डोझा,उपाध्यक्ष – मीरा भाईंदर श्री.यश जोशी,मुंबई सचिव श्री.नंदकुमार बागवे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments