
प्रतिनिधी : बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आला आहे .
माथेरान डोंगरात हा बोगदा खोदण्यात आला आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे.या बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलंय. या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.