कोरेगाव(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारणारे आदरणीय दिवंगत शंकरराव जगताप यांनी संपूर्ण कोरेगाव मतदार संघात विकासाचे जाळे निर्माण केले होते. आज त्याच कोरेगाव मतदार संघाचा विकास ठप्प झाला आहे. व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप व टिंगल टवाळी होऊ लागलेले आहे. एवढेच नव्हे तर ठेकेदारी व आमदार अशा नाण्याच्या दोन बाजू जनतेला पाहण्यास मिळत आहे. म्हणूनच कोरेगावात ठेकेदारमुक्त आमदार निवडून आणण्यासाठी उमेदवारी जाहीर झालेले आहे. असे प्रतिपादन रिपाई म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील विकासाच्या कार्यासाठी धरणग्रस्त म्हणून ज्यांनी आपली जमीन दिलेली आहे. असे धरणग्रस्त असलेले व वन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री चंद्रकांत कांबळे हे सध्या सामाजिक कार्यातून व विधायक राजकारण कसे असावे? याचे उदाहरण म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटात सध्या कार्यरत आहेत. त्यांनी व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करून आचारसंहितापूर्वीच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. आज त्यांच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण झालेली आहे.
सामान्य कुटुंबातील व्यक्ती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे हक्काचे आमदारकीची स्वप्न का पाहू शकत नाही? आमदार होणे म्हणजे सामान्या कुटुंबातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या मतदाराने प्रस्थापितांनी दिलेल्या शह आहे. असे आता कोरेगाव मतदारसंघात मानले जात आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात झालेल्या निवडणुकीत प्रमुख दोन राजकीय उमेदवारांमध्ये लढती झाल्या. तरी त्यांच्या मताच्या मताधिक्यापेक्षाही या इतर उमेदवारांना व नोटाला मिळालेली मतं अधिक आहेत हे आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे.
यंदाची कोरेगाव विधानसभा मतदार सघाची निवडणूक ही प्रस्थापितांसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. आणि याचा केंद्रबिंदू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री. चंद्रकांत कांबळेच असणार आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित केले जाणार आहे.
२०१९ ची कोरेगाव मतदार संघात राजकीय परिस्थिती वेगळी होती. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना १ लाख१,४८७ तर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे यांना ९५ हजार२२५ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीला २५८३, बहुजन समाज पक्षाला २०८८ आणि तीन अपक्षांना मिळून २हजार मते मिळाली. तसेच नोटाला१२८४ मते मिळाली होती.
या निवडणुकीत साडेसहा हजार मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते .आता तसं पाहिलं तर राजकारणाच्या भेळ मिसळमुळे निष्ठा, तत्व व वैचारिक भूमिका, आघाडी असो अथवा युती होय .पूर्णपणे राजकीय विचारधारा बदलून गेलेली आहे. परंतु कोरेगाव मतदार संघातील सुज्ञ मतदार आता विचारपूर्वक मतदान करणार आहेत .सध्या विकास कामे ही खर्चिक बाब झालेली आहे. कारण, ठेकेदारी एवढी बोकाळली आहे की, मतदारांपेक्षा आमदारांकडे ठेकेदारांचे गर्दी वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामाच्या नावाने निधीवाटप खर्चिक बाब झाली आहे . नको त्या गोष्टीवर चर्चा होते तसेच कार्यकर्त्यांची गळचेपी सुरू आहे. पैशातून सत्ता,, सत्तेतून पैसा अशी स्वप्न पाहून प्रस्थापित राजकीय पक्ष व मंडळी निवडणूक लढवत आहेत. पण, येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.१९५९ साली जे विस्थापित झालेले आहेत. त्यांचे कोरेगाव मतदार संघात पुनर्वसन झाले असले तरी त्यांच्या शेतीला पाणी नाही. लाभ नाही. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आदरणीय माजी आमदार कोरेगावचे विकासरत्न श्री जगताप यांच्यानंतर विकास कामे खोळंबलेले आहेत. जी काय निकृष्ट दर्जाचे रस्ते, सामाजिक सभागृह , पूल व इतर विकास कामे झालेले आहेत. त्यामुळे काही ठेकेदारीनी ठेकेदारीतून लूट केली आहे. हे सामान्य जनता कधीच विसरू शकत नाही.
प्रस्थापितांना दूर करून चांगले घडवायचे असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री चंद्रकांत कांबळे यांच्या पाठीशी राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई, हेमंत भोसले, आंदोलनाचे बादशहा संजय गाडे, युवा नेते विशाल कांबळे, रेखा सकट, आशुतोष वाघमोडे, मोरे, प्रशांत उबाळे व अनेक माता भगिनी यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे.
निदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपल्या मताच्या अधिकारावर आपलाच हक्क… अशा अभिनव योजनेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मैदानात उतरलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते जे आदेश देतील. त्या आदेशाची अंमलबजावणी करणारे शेकडो भीमसैनिक असून २०२४ ची निवडणूक ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कलाटणी देणारी ठरेल. असे ही त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ – २५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोरेगाव मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील पुसेगांव आणि खटाव ही महसूल मंडळे आणि कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड, किन्हई, कुमठे आणि कोरेगांव ही महसूल मंडळे आणि सातारा तालुक्यातील वडुथ, खेड आणि तासगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जे अधिकृत चिन्ह मिळेल. त्याच्या प्रचारासाठी आता रणनिती आखली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
ठेकेदारमुक्त आमदारकीसाठी कोरेगावात रिपाईची उमेदवारी- चंद्रकांत कांबळे
RELATED ARTICLES