Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमेडिकवर हॉस्पिटलचा वतीने नवी मुंबईत अनोख्या आरोग्य मेळाव्याचे आयोजन

मेडिकवर हॉस्पिटलचा वतीने नवी मुंबईत अनोख्या आरोग्य मेळाव्याचे आयोजन

नवी मुंबई : आपला आहार हा शारीरिक स्वास्थ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराच्या चुकीच्या सवयी लागत असून यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.मेडीकवर हॉस्पिटल नवी मुंबईने नुकतेच पोषक आहार आणि जीवनशैलीसंबंधीत योग्य बदलांना देण्यासाठी अनोखा अशा पोषण मेळाव्याचे आयोजन केले आहे. डाएटीक्स विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतुलित आहाराच्या महत्त्वाविषयी उपस्थितांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या मेळाव्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोफत शरीर रचना विश्लेषण (body composition analysis): यामध्ये प्रशिक्षित आहार तज्ञांकडून उपस्थितांच्या शरीर रचनेचे विश्लेषण करण्यात आले, ज्यामध्ये सहभागींचे आरोग्य आणि फिटनेसबद्दल त्यांना योग्य माहिती देत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महत्त्वाच्या तपासण्या: उपस्थितांना त्यांच्या एकूण आरोग्याचे मूल्यांकन करण्यात मदत करण्यासाठी या कार्यक्रमात रक्तातील साखरचे पातळी तपासणे (RBS) आणि रक्तदाब (BP) तपासण्यांसह मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

फूड स्टॉल्स: रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचे स्टॉल्स उभारून त्यांचे पाककौशल्य सादर केले.

मनोरंजनात्मक कार्यक्रम व खेळ: या मेळ्यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. राजेश्वरी पांडा(मेडिकवर हॉस्पिटल,नवी मुंबईच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख) यांनी या कार्यक्रमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या पोषण मेळाव्यात अनेक नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले, याचा आम्हाला आनंद झाला. यामाध्यमातून नागरिकांना त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आमचे मुख्य ध्येय होते. हा कार्यक्रम आमच्या सर्वच स्तरातील नागरिकांशी जोडण्याचा आणि निरोगी सवयींना प्रोत्साहन देण्याची एक उत्तम संधी होती.

मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई हे सर्वप्रकारच्या आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा पोषण मेळावा समाजाला शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी एक उदाहरण ठरत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments