Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रपाटण डाकेवाडीच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या राजधानीत होणार गौरव

पाटण डाकेवाडीच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या राजधानीत होणार गौरव

कराड : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) चे सुपुत्र डाॅ.संदीप डाकवे यांचा महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने रविवार दि.29 सप्टेंबर, 2024 रोजी गौरव होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने वरळी च्या एनएससीआय मध्ये कृषी वितरण सोहळा आयोजित केला आहे.
कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. रु. 1 लाख 20 हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डाॅ.संदीप डाकवे हे गेली 18 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत.
सदर कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य सदस्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पटकावणारे डाॅ.डाकवे हे पाटण तालुक्यातील पहिले आणि सातारा जिल्हयातील पाचवे पत्रकार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून 8 पत्रकारांचा यावेळी सन्मान होणार आहे. कृषी क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्यांना दिशादर्शक असावे या हेतूने 1994-95 पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी शेतीविषयक वृत्तपत्रातून उत्कृष्ट वार्तांकन, यशोगाथा, कृषिसंदेश यांचे लिखाण केले आहे. तसेच कृषिविषयक लेखमाला, पुस्तक प्रकाशन, निवडक लेखांचे प्रदर्शन, कृषिविषयक व्यंगचित्रे, हस्तलिखिते आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.डाकवे यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा संतोषकुमार बरकडे, कृषि विकास अधिकारी जि.प.सातारा विजय माईनकर, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे, तंत्र अधिकारी (विस्तार) जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा समीर पवार, कृषि सहायक प्रमोद गाढवे, कृषी सहायक ए.बी.पवार व जी.डी.सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

चौकटीत :
महाराष्ट्र शासनाकडून मिळालेेले पुरस्कार :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
राजमाता जिजाऊ स्वावलंबन सवोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
जि.प. कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments