Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या गुणवत्ताधारी शतक महोत्सवी वाटचाल

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या गुणवत्ताधारी शतक महोत्सवी वाटचाल


सातारा(अजित जगताप) : गुरु ब्रह्मा…. गुरु विष्णु… गुरु महेश असे प्राचीन काळी गुरु बद्दल आदर भाव व्यक्त केले जात होते. आता विज्ञान युगामध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील ,शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण करणारे शिक्षण प्रेमी यांच्या आदर्शाने आजही ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे.अनेक युगपुरुषांच्या प्रेरणेमुळे खऱ्या अर्थाने समाजाला सुशिक्षित बनवण्याचे काम प्राथमिक शिक्षक करत आहेत. आज आशा सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची सहकारी बँक शतकी वर्धापन दिनाकडे वाटचाल करत आहे. ही आनंदाची बाब आहे.
यामध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने नियमाचे पालन करून गुणवत्ता राखल्यामुळेच हा आनंदाचा सोहळा दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरा होत आहे. याचे मनस्वी आनंद सातारकरांना झालेला आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसोबत गुरुजनांचीही छाती अभिमानाने फुलणारी गोष्ट सातारच्या भूमीत घडलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या याच सातारा शहरांमध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे १७ एप्रिल १९४८ रोजी रोपटे लावण्यात आले. आज सातारा जिल्ह्यातील सातारा, वडूज, वाई, फलटण, दहिवडी, कोरेगाव, मेढा, महाबळेश्वर, खंडाळा, म्हसवड ,रहिमतपूर, कराड व पाटण या ठिकाणी सध्या प्राथमिक शिक्षक बँकेची आर्थिक दौड सुरू आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील रविवार पेठ मुख्यालयामध्ये सध्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रगतीचा शिलालेख म्हणजेच पोवई नाका येथील शिवतीर्थावरच प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची इमारत असे समीकरण झालेले आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे तरुण तडफदार चेअरमन किरण यादव, व्हाईस चेअरमन शहाजीराव खाडे यांच्या सोबतच बँकेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री छगन खाडे व त्यांची सर्व टीम वित्तीय संस्थेचे सर्व नियम पाडून प्रगती दाखवून प्राथमिक शिक्षक बँकेची मान उंचावत आहेत. या बहुमूल्य व भरीव कामगिरीसाठी सर्वच आजी माजी संचालक व सभासद प्राथमिक शिक्षक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन मोलाचे ठरलेले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, दोंदे प्रणित शिक्षक संघ, त्याचबरोबर शिक्षक भारतीय संघटना, सेवानिवृत्त शिक्षक संघ, मागासवर्गीय शिक्षक महासंघ, अपंग कर्मचारी शिक्षक संघटना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन शिक्षक संघटना ,शिक्षक सेवा मंच, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, आदर्श बहुजन शिक्षक संघ , कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक विभाग व प्रहार शिक्षक संघटना अशा अनेक संघटनांचे हे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. या सर्व घडामोडी मध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने शताब्दी महोत्सवात वाटचाल केली आहे .
या १०० वर्षाच्या परंपरेला साजेसे साताऱ्यात वर्धापन दिन साजरा होत आहे .त्यामुळे सर्व शिक्षक व प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक सभासद खऱ्या अर्थाने दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी करत आहेत. हा सातारकरांसाठी आनंदाचा क्षण आहे. सातारच्या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था, प्राथमिक शिक्षक अध्यापन महाविद्यालय तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी बँक या दोन महत्त्वाच्या संस्था साताऱ्यात आहे. याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला लेखापरीक्षणामध्ये अ वर्ग मिळाला आहे . बँकेचे दहा हजार २७० सभासद व ३४ कोटी१८ लाख निधी आणि ४० कोटी २६ लाख भाग भांडवल७०५ कोटी १५ लाख ठेवी व ४८२ कोटी तीन लाख कर्ज असे मिळून कळते भांडवल ८१३ कोटी ९१ लाख व ठेवी७०५ कोटी १५ लाख म्हणजेच वार्षिक उलाढाल दोन हजार कोटीच्या पुढे गेलेले आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेने ठेवीसाठी आकर्षक व्याजदर देणाऱ्या बँकेची परंपरा आजही कायम राखली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्के ज्यादा व्याजदर दिले जात आहे. सेवेतील कर्जदार सभासद मयत झाल्यास सभासद कल्याण निधीतून सभासद कर्ज निधीतून व कुटुंब कल्याण निधीतून असे एकूण किती बाजूने अर्थसहाय्य दिले जात आहे. कर्जदारांसाठी ही मदतीचा हात पुढे केलेले आहे.
याचबरोबर सोने तारण, अल्पमुदत, वाहन तारण ,आकस्मित दीर्घ मुदत, घर बांधणी, प्लॉट- फ्लॅट खरेदी, शैक्षणिक तातडीचे कर्ज ,सभासद ओवर ड्रॉप, फेस्टिवल, दीर्घ मुदत कर्ज नंबर एक, आपत्ती निवारण कर्ज, अल्प मुदत कर्ज नंबर दोन अशा पद्धतीने कर्ज वितरित करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे शतक महोत्सवी वर्षांमध्ये सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने वाई, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, म्हसवड व रहिमपूर येथे स्वतःच्या वास्तूमध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज सुरू केलेले आहे. सर्व शाखा संगणीकृत झालेले असून सभासद पती-पत्नींना एक लाख वैद्यकीय मदत व इतर अनेक नव्या नव्या संकल्पनेतून सभासदांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे.
याचबरोबर सर्व शाखांमध्ये लॉकरची सुविधा देण्यात आलेली आहे. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या सभासदांच्या गुणवत्ते विद्यार्थी कौतुक सोहळ्यास सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जात आहे. आपली बँक… आपली माणसं… आणि आपली प्रगती… हे प्राथमिक शिक्षक बँकेचे ब्रीदवाक्य ठरलेले आहे. कर्जामध्ये सलग मासिक हप्त्यामध्ये पन्नास टक्के परतफेड झाल्यानंतर पुन्हा वेतनातून कर्ज देण्याची ही परंपरा या बँकेने कायम ठेवलेले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांसाठी ही बँक नसून कुटुंबप्रमुखाचे भूमिका बजावत असल्याचे दिसून आलेले आहे. या बँकेने प्रामाणिकपणाने बँकिंग सोबतच माणुसकी जपलेली आहे.
तसं पाहिलं तर समाजाला प्रामाणिकपणाने उच्च विद्या विभूषित करण्यासाठी पायाचा पायाभरणी करणाऱ्या या प्राथमिक शिक्षकांनी नुसतं ज्ञानदान न करता एक सक्षम पिढी घडवण्यासाठी प्रयत्न केले. आज समाजामध्ये शिक्षकांबद्दल आपुलकीचे नाते निर्माण झालेले आहे. पूर्वी प्राथमिक शिक्षक यांच्यावर समाज घडवण्याची जबाबदारी होती. त्यामुळेच देश पातळीवर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री एवढेच नव्हे तर राज्यातील अनेक मंत्रिमंडळामध्ये व सध्याच्या तर काळामध्ये प्रशासकीय सेवेत ही शिक्षक वर्ग स्पर्धा परीक्षेतून पुढे येत आहे. ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला शुभेच्छा देण्यासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई व सातारा जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी वर्ग, हितचिंतक यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक २२ सप्टेंबर रोजी सातारा येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा जिल्हा परिषदेच्या मागे कार्यक्रम होत आहे. ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याने प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व पदाधिकारी व संचालक आणि सभासद यांना मनापासून शुभेच्छा देत आहे या प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेच्या शाखा या सातारा जिल्ह्यापुरत्या मर्यादित न राहता त्याचा राज्यभर विस्तार व्हावा. या बँकेच्या सभासदांना राज्यसभा व विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी करून हा लेख प्रपंचा स्वल्पविराम देऊन स्थगित करतो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments