प्रतिनिधी : बदलापूर एरंजाड इको फ्रेंडली लाईफ सेंटर येथे KC अभियांत्रिक कॉलेजच्या तरुणांसोबत २१ सप्टेंबर २०२४ रोजी बदलापूर येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक निसर्गरम्य अनुभव देण्याची संधी EFL निर्माण करत आहे. आज लावलेलं एक रोपट उद्या मोठे होऊन आपल्यालाच उपयोगी पडणार आहे. झाड हे निसर्गाने निर्माण केलेलं एक निस्वार्थी रूप आहे ते टिकवणे आता काळाची गरज आहे, खास करून तरुणांची. इको फ्रेंडली लाइफचे संस्थापक आणि पर्यावरण रक्षण चळवळीचे प्रणेते श्री. अशोक एन. जे. साहेब तसेच EFL चे सर्व समनवयक उपस्थित असणार आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल सकाळी ९.०० वाजता सर्व K.C.अभियांत्रिकी कॉलेजचे तरुण बदलापूर जवळील एरंजाड इको फ्रेंडली लाइफ सेंटरला पोहचतील. ९ ते १० इको फ्रेंडली लाईफ च्या कामाविषयी इंट्रोडक्शन होईल. १० ते १०.२५ श्री. अशोक एन. जे. यांचा सुसंवाद होईल. १०.२५ ते १२.३० वृक्षारोपण होईल. १२.३० ते १.३० जेवण होईल. २.०० ते ३.०० निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट आणि व्हिडीओज होईल. ३.०० वाजता समारोप करण्यात येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही इको फ्रेंडली लाईफच्या 9867181600 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
