Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रलोकसभेला अपक्ष उमेदवारांना म्हणजे नोटाला मत असंच समीकरण …

लोकसभेला अपक्ष उमेदवारांना म्हणजे नोटाला मत असंच समीकरण …


सातारा (अजित जगताप) : लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहे आणि हा अधिकार संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना उपभोगता येतो. त्यामध्ये कुणीही आडकाठी आणू नये परंतु, सध्या सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही अपक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत पण एकूणच निवडणुकीची मागील आकडेवारी पाहता अपक्षांना मत म्हणजे नोटाला मत कारण अनेक जणांच्या डिपॉझिट जप्त होते. पण, ज्यांनी मतदान केलेले आहे त्यांचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. या अर्थाने काही अपक्षांना मत म्हणजे नोटाला मत जात आहे. हे कोणी विसरून जावू नये.अशी आता खुली आमच्या चर्चा सुरू झालेली आहे. भारतीय राज्यघटनेने व संविधानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार आपण वापरलाच पाहिजे. कारण, आपण लोकांचे लोकप्रतिनिधी निवडून देत आहे. याची जाणीव ठेवून मतदान करणे. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे अनेक जण मतदान करतात. पण, काही वेळेला चुकीच्या व्यक्तीला मतदान केले तर पाच वर्षे नव्हे तर एक पिढी बरबाद होते. खरं म्हणजे प्रतिनिधीचा अर्थ त्या लोकांच्या समस्या मांडणारे व्यक्ती असा आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न महामार्गावरील टोलनाच्या बाबत वसुली व सर्विस रोडची दुरावस्था, महागाई, बेरोजगारी, आरक्षण व नागरी सुविधा अशा विविध कारणांसाठी आंदोलन होतात तसेच निवेदन दिले जाते. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा एकच पर्व… बहुजन सर्व…, अल्पसंख्याकांच्या अधिकाराचा प्रश्न असेल किंवा भटक्या विभक्त जाती जमातीचा प्रश्न असेल. या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.
एखाद्या राजकीय पक्षांनी उमेदवार लादला तर त्याला विरोध करण्यासाठी काही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांचे स्वागत आहे. जे कधीही कोणत्याही आंदोलन सहभागी होत नाहीत. एखाद्या समाज घटकावर अन्याय झाला तर त्याबाबत आवाज उठवत नाहीत. अशा व्यक्तींचा जन्म फक्त उमेदवारी लढवण्यासाठी आहे का ? हा सुद्धा आता मतदार विचार करू लागलेले आहेत.

सातारा जिल्ह्याची आकडेवारी पाहता सातारा लोकसभा मतदारसंघ २०१९ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत १८ लाख ५० हजार ३९३ मतदान होते . त्यापैकी १२ लाख ३९ हजार ५४८ संख्या एवढे मतदान झाले होते. या सर्व गोष्टींचा लेखाजोखा सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता जनजागृती करणे गरजेचे आहे. .शेवटी संविधान व लोकशाही हा फक्त फायद्याचा विषय नसून त्यासाठी आपण त्याचे रक्षण करण्यासाठी किती लढलो ? याचेही अशा अपक्ष उमेदवारांना आत्मचिंतन करावे. मतदारांना गृहीत धरून एक वेळ राजकारण होऊ शकते पण कायमस्वरूपी लोकांना गृहीत धरून त्याची फसवणूक करणे. हा ही राष्ट्रीय गुन्हा आहे . मतं पेटीतून शिक्षा मिळतेच त्यामुळे जे खरोखरच चळवळीसाठी काम करतात. लढतात .लोकांसाठी रस्त्यावर उतरतात. अशा अपक्ष उमेदवारांचे स्वागतच आहे .त्यांच्यामुळेच लोकशाही जिवंत आहे. पण ज्या संधी साधू आहेत त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे याची सुद्धा आता खेड्यापाड्यात चर्चा सुरू झाली आहे. सातारा नगर परिषदेच्या प्रभागात एखाद्या नगरसेवकांना जेवढी मतं पडतात त्याचे पेक्षा कमी मतं २०१९ च्या पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार ला पडले होते. आज काही जण अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत. त्यांना कोणी स्वीकारत नाही. कारण लोकशाही अजून जिवंत आहे. संविधान अजून जिवंत आहे. ते कधीही नष्ट होणार नाही. हेच यातून दिसून येणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments