
मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण कधी बदलेल काही सांगू शकत नाही. सतत राजकारणाची गणितं बदलताना दिसतात. अशातच आता राजकारण मोठ्या पडद्यावरही पहायला मिळत आहे. नुकताच राजकारणावर आधारित ‘धर्मवीर’ सिनेमाही आला होता. आता राजकारण रंगभूमीवरही रंगणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण रंगमंचावर दिसणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “मला काहीतरी सांगायचंय” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित हे नाटक असणार आहे. एकपात्री नाटकाद्वारे एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव रंगभूमीवर मांडला जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील गाजलेली जोडी कोणती? स्वत: बिग बॉसनेच सांगितले नाव “मला काहीतरी सांगायचंय” या नाटकाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ असणार आहे. एकपात्री नाटक, दीर्घांक द्वारे एकनाथ शिंदे काय नेमकं सांगणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. दोन दिवसांत या नाटकाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सध्या नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याचे म्हटले जात आहे. या नाटकाचं पोस्टरही समोर आले आहे. या नाटकाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता या नाटकाविषयी लोकांची उत्सुकता वाढली असून यामध्ये काय विशेष पाहायला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.