सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना निकृष्ट दर्जाचे बांधकाम खपवून घेणार नाही. असे प्रतिपादन
सातारा जिल्हा परिषद बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी शासकीय सेवेत पहिली नियुक्ती झालेले तरुण अधिकारी म्हणून अमर नलवडे यांच्याकडे सूत्र आलेले आहेत. बी टेक पर्यंत शिक्षण झालेल्या श्री नलवडे यांचे मूळगाव वायफळ तालुका तासगाव जिल्हा सांगली आहे.
स्पर्धा परीक्षेतून त्यांनी गुणवत्ता प्राप्त करून यश संपादन केलेले आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच शासकीय सेवेत काम करून नागरी सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेण्यात निश्चितच यश मिळते. प्रत्येक निविदांबाबत काळजीपूर्वक तपासणी करून तशा पद्धतीने काम करून घेणे .हे अधिकारी वर्गासोबतच स्थानिकांचाही महत्वपूर्ण योगदान असणे गरजेचे आहे. सध्या जी कामे प्रलंबित आहे. ते गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. श्री.नलवडे यांच्याकडे सातारा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील खटाव, माण, कराड, पाटण जावळी हे तालुके येत आहेत. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासह उत्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांनाही कामाची गुणवत्ता राखण्यासाठी सहकार्य करावे. असे त्यांनी स्पष्ट केले.
