
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या अंशुमन झिंगरान या विद्यार्थ्यांने दि. १३ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले.मुंबई विद्यापीठ व प्रगती महाविद्यालय डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंशुमनने २०० मीटर व १५०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्य व कांस्य पदक पटकावले. अंशुमन झिंगरान हा विद्यार्थी पदवीच्या प्रथमवर्षात शिक्षण घेत आहे.यापूर्वीही त्याने जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी तिच्या चमकदार यशाचे कौतुक आणि अभिनंदन केले. उपप्राचार्य प्रो.डॉ.राजेश्री घोरपडे तसेच जिमखाना चेअरमन डॉ. बिपीन शिंदे, क्रीडा संचालक प्रा. महादेव खाडे व जिमखानाप्रमुख प्रा. भास्कर हनवटे यांनी त्याचे अभिनंदन केले.