नवी मुंबई : कराड दक्षिण मतदार संघातील विकासाची गंगा आणणारे,गावोगावी रस्ते,इतर सुविधा निर्माण करणारे विकासपुरुष,माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण

मुंबईस्थित बांधवांशी त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना भेटण्यासाठी रविवार दि २९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी,नवी मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, जि. प.सदस्य,सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ऍड.उदय दादा पाटील,यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहून आपल्या गावच्या उर्वरित समस्या जाणून घेणार आहेत.निवडणुका येतील आणि जातील परंतु जनतेशी जवळीक साधून त्यांच्या गावातील अडीअडचणी सोडव्याची जबाबदारी कराड दक्षिणचे प्रथम नागरिक म्हणून आमदारांची असते,आणि ती जबाबदरी लक्षात घेऊन फक्त आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा न करता त्यांच्या कुटूंबासोबत चर्चा करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले आहे. मुंबई, ठाणे,नवी मुंबई येथे राहणारे कराड दक्षिण मधील सर्व काका-बाबा प्रेमी नागरिकांनी कुटूंबासोबत या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.