कराड (प्रतिनिधी ) येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने गेल्या 32 वर्षापासून एक गाव एक गणपती हा राबवलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब यांनी केले . जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ व लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते , यावेळी ते बोलताना म्हणाले की जय महाराष्ट्र गणेश मंडळाने या पुढे देखील अविरतपणे एक गाव एक गणपती ही परंपरा कायम ठेवावी आपल्या गावाला एक संघ ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उंडाळे चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस .जी. जाधव ,हवालदार एस .एन .माने ,गोपनीय शाखेचे देशमुख साहेब,डॉ. स्नेहा अहीर ,कॅम्प इन्चार्ज संतोष विभुते ,अर्चना पवार ,हनमंत तावरे ,आरोग्य सहाय्यक बाबासाहेब सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरामध्ये 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली, यामध्ये दोन रुग्णांच्या मोफत मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी पाठवण्यात आले ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श सूर्यवंशी यांनी केले,तर आभार पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मानले .
