सातारा(अजित जगताप) : बुद्धीची देवता व विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण शाहू नगरी सज्ज झालेले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री बाळकृष्ण देसाई यांच्या निवासस्थानी गणराया व गौरीच्या आगमनानंतर विधिवत पूजाअर्चा होत आहे. उद्या पारंपारिक वाद्यांसह गणेश विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती श्री देसाई यांनी दिली आहे.
श्री गणरायाची गेली ४० वर्षे भक्तीभावाने पूजाअर्चा करणारे श्री देसाई यांनी सर्व जाती-धर्माच्या कल्याणासाठी श्री गणरायाने लक्ष द्यावे. अशी प्रार्थना केली. महारुद्र हाऊसिंग सोसायटी, गोडोली येथील त्यांच्या स्नेहपर्व या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी भेट दिली. आहे.
श्री गणराया व गौरी गणपतीच्या देखावा व सजावटीसाठी गणेश भक्त श्री महेश देसाई सौ. शरयू देसाई व सौ पद्मजा देसाई व आता बाळकृष्ण देसाई यांच्यासह गणराय बालभक्त श्रीष व अनुश यांनी सहकार्य केले.
सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. सर्व धर्म स्वभाव मानून वंचित समाजाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपणारे श्री बाळकृष्ण देसाई यांनी आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळेल. असेही स्पष्ट केले.
