प्रतिनिधी(प्रताप भणगे) : आझाद गणेश मंडळ,उंडाळे रौप्य महोत्सव वर्ष निमित्त आणि “संकल्प नवा प्रत्येक घरी..एक रक्तदाता हवा” गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन :-मा श्री उदयसिंह पाटील (दादा) व मा श्री.दादासो पाटील (माजी सरपंच ),मा श्री दादासो पाटील (ग्राम पंचायत सदस्य) व मंडळाचे पदाधिकारी याच्या हस्ते संपन्न झाला.मंडळाने ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे ब्रीद घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी शिबिराला आलेल्या रक्तदात्यांची पाहुण्यांनी भेट घेत विचारपूस केली. मंडळाने राबवलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे. ही सामाजिक बांधिलकी प्रत्येक गणेश मंडळांनी जपली पाहिजे… उंडाळे गावचे श्री अँड.विजयसिंह पाटील (बाबा दादा ) व उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे मा डॉ शेखर कोगनुळकर (सर) आणि मा श्री उदय पाटील (आबा) यांनीही कार्यक्रमास भेट दिली .. याप्रसंगी मोठ्या संख्येने रक्तदाते आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.व महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता ..प्रत्येक रक्तदान रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आली यावेळी ६६ रक्तदात्यांनी विक्रमी नोंद करण्यात आली…ह्या मधे उंडाळे मधील प्रथमच महिला सौ सुजाता संजय पाटील यांनी रक्तदान केले आणि देशसेवीतील जवान यांनी रक्तदान केले त्या बद्धल त्यांचे व सर्व रक्तदात्यांचे मंडळाने सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.
आझाद गणेश मंडळ,उंडाळे रौप्य महोत्सव वर्ष निमित्त “संकल्प नवा प्रत्येक घरी..एक रक्तदाता हवा” सामाजिक उपक्रम
RELATED ARTICLES