सातारा(अजित जगताप) : जावळीचे सुपुत्र आदरणीय मार्गदर्शक पैलवान साहेबराव भाऊ पवार यांचा सातारा तालीम संघाच्या मैदानावर शंभरावा वाढदिवस साजरा झाला. पुढील वर्षी असाच १०१ वा वाढदिवस जोरदार साजरा करू अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक मान्यवरांनी भाऊंचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. जावळी तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र असलेल्या पैलवान साहेबराव पवार भाऊ यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी अनेक सहकारी पैलवान पैलवानांच्या सोबत तालीम संघाची उभारणी केली. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जावळीचे माजी सभापती, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष, सत्यशोधक विचारांचे पाईक ,क्रीडा संघटक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा अनेक चौफेर ठिकाणी आपले कर्तव्य दाखवून दिले.
आज सातारा शहरातील तालीम संघ मैदानावर कोणतीही सत्ता नसताना पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शंभरावा वाढदिवस साजरा करताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या चित्रमय चरित्र पाहून भाऊंच्या कार्याची ओळख अनेकांना झाली. रविवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा तालीम संघाचे मैदान कार्यकर्त्यांनी भरून गेले होते. शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती. विशेष म्हणजे पैलवान साहेबराव पवार यांच्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातूनही अनेक जण आले होते.
यावेळी आपल्या छोट्याशा शुभेच्छा भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार असताना माझे बोट धरून जावळीतील गावोगावी त्यांनी प्रचार केला. त्यावेळी जावळी व महाबळेश्वर तालुका व सातारा तालुक्यातील छत्तीस गावे जावळी विधानसभा मतदारसंघात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाऊंनी आपला दांडका जनसंपर्क दाखवून दिला. साहेबराव भाऊंनी मला प्रचंड प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. भाऊंनी ज्यांना घडवले त्या सर्व एकत्र जमण्याचे पाहून हृदय भरून येत आहे. ताठ मानेने व स्वाभिमानाने कसे जगावे? याचे जलद उदाहरण म्हणजे साहेबराव भाऊ आहेत. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला याची चिंता आहे ती बदलून दाखवण्याची धमक साहेबराव भाऊ यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आहे स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांची काँग्रेस पुन्हा मजबूत करण्यासाठी भाऊंच्या आशीर्वाद महत्त्वाचे आहेत सध्या वर्णव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असून फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा शाश्वत राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. असे स्पष्ट करून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आदरणीय साहेबराव भाऊ यांच्या १०१ वा पुढील वर्षी वाढदिवस अशाच पद्धतीने जोरदार साजरा करावा अशी त्यांनी सूचना केल्या.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील ,आमदार शशिकांत शिंदे, डॉ .सुरेश जाधव, आनंदराव कणसे, अमित कदम , सागर पावशे, नासीर शेख, बुवासाहेब पिसाळ, विठ्ठल मोरे, अंकुश दुदुसकर , विजय महाडिक,गणेश जगताप ,दादा रासकर, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, किरण साबळे पाटील, पैलवान साहेबराव जाधव, प्रभाकर शिंदे, ऍड उदयसिंह पाटील, रजनी पवार, शंकरराव गाढवे, बापूराव पार्ट, आनंदराव जुनघरे ,अशोक परामणे, जनार्दन नवले, विकास भिलारे, राजू जेधे ,हिंदुराव पाटील, सुनील माने, राजकुमार पाटील, , अजित भोसले, सुरेश मोरे, दुर्योधन महामुलकर, किरण माने, प्रकाश गवळी, अण्णा वायदंडे, गुरुदास अडागळे, विशाल कदम, शहाजी गुजर व जिल्ह्यातील विशेषता जावळी, सातारा, वाई, कराड, महाबळेश्वर तालुक्यातील अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटून पुष्पगुच्छ, हार, शाल, देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमासाठी सर्व सातारा जिल्हा व परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता व कार्यकर्त्यांनी धन्यवाद दिले.
पै.साहेबरावभाऊंचा १०१ वा वाढदिवस असाच जोरदार साजरा करू- पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES