। नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे औचित्य साधून, वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या जयंती सप्ताहात विविध उपक्रम, कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
२२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जयंतीदिनी सोलापूर (मोहोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रार्थना फांऊडेशनचे प्रमुख प्रसाद मोहिते व अनु मोहिते हे प्रमुख पाहुणे म्हणून तर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर हे कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मोहिते यांना कर्मवीर पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्त्या अनु मोहिते यांना लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंचवीस हजार रूपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
केबीपी महाविद्यालयात कर्मवीर जयंती सप्ताहाचे आयोजन
RELATED ARTICLES