मुंबई (रमेश औताडे) : दारूबंदी करून मोफत आरोग्य व शिक्षण तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण केली तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. असे स्पष्ट मत जय महाभारत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विष्णु यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदी . गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना निवारा, इंधनाला पर्याय म्हणून गोबर गॅस योजना, उत्तम मोफत शिक्षण. अजून रुग्णालये बांधून मोफत उत्तम वैद्यकीय सेवा आणि औषधे देण्यासाठी आमच्या पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत असे अनंत विष्णु यावेळी म्हणाले.
सर्व नद्या जोडून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्याऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीची वेगळी आखणी, सर्वसामान्य नागरिक व खास करून सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे असे अनंत विष्णु यांनी सांगितले.