वडूज (अजित जगताप) : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पेडगाव ता. खटाव जिल्हा सातारा येथील एक आदत एक बैल या धर्तीवर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी बैलगाडी शर्यत होत आहे. यावेळी खटाव- माण केसरी ट्रॉफी व रोख रक्कम कोणती प्रथम विजेती बैलगाडी घेऊन जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एक आदत एक बैल अशा या बैलगाडी शर्यत सर्व स्पर्धकांनी शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून ते नेमून दिलेल्या पंचांच्या निर्णयावर अंतिम निकाल देण्यात येणार आहे. याची जाणीव ठेवावी. यावेळी शेतकरी कुटुंब व बैलगाडीची आवड असणाऱ्या सर्वांनीच बैलांच्या आरोग्याची काळजी घेणे. बंधनकारक आहे. कारण शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा मित्र म्हणून शर्यतीच्या बैलांकडे पाहिले जात आहे. या बैलगाड्या शर्यतीमुळे खऱ्या अर्थाने सर्वांना सोयीचे ठरावे यासाठी प्रत्येक बैलगाडी शर्यतीत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी वेळेत हजर राहून कर्तव्य बजावले पाहिजे. त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीचे शौकीन व प्रेक्षकांनी सुरक्षित अंतर ठेवूनच या बैलगाडी शर्यतीचा आनंद घ्यावा .अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार ही सर्व बैलगाडी शर्यत मोठ्या आनंदाने पार पडणार असून गणेशोत्सवानिमित्त आशीर्वादही लाभलेले आहेत. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकाचे २ लाख ५५ हजार पाच रुपये, द्वितीय क्रमांक २ लाख पाच हजार पाच रुपये, तृतीय क्रमांक १ लाख पंचावन्न हजार पाच रुपये ते इतर बक्षीसासह दहाव्या क्रमांकावर दहा हजार एक रुपया अशा सुमारे किमान दहा ते बारा लाख रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रताप गोडसे यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील पेडगाव फाटी या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत होणार असून प्रवेश शुल्क १५०० रुपये ठेवण्यात आलेले आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी संपूर्ण बैलगाडी शर्यती स्पर्धकांनी आगाऊ नोंदणी केलेली आहे. इच्छुकांनी या स्पर्धेसाठी रंजीत जाधव ९९२२२५२७६१ व अंबवडे तालुका खटाव येथील संदीप पवार ९७३०१८७७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बैलगाडी शर्यत आयोजकांनी केलेले आहे. यानंतर दिनांक १८ सप्टेंबर रोजी रोजी मा. आमदार घार्गे यांच्या पळशी तालुका खटाव या गावांमध्ये जंगी कुस्ती मैदान भरवण्यात येणार आहे . यामध्ये पैलवान मारुती कोकाटे, पैलवान प्रकाश बनकर, पैलवान किरण भगत, पैलवान विनोद यादव, पैलवान पृथ्वीराज मोहोळ, पैलवान विशाल यादव, पैलवान ऋषभ, पैलवान गणेश फुंकले, यांच्यासह अनेक पैलवान सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या ऐतिहासिक भूमीमध्ये प्रथम क्रमांकाचे पाच लाख पाच हजार पाच रुपये तसेच तीन लाख पाच हजार पाच रुपये व इतर बक्षीस ठेवण्यात आलेले असल्याची माहिती माजी आमदार प्रभाकर घार्गे वाढदिवस समितीने दिलेली आहे.
शनिवार दि.१४ रोजी पेडगावात रंगणार बैलगाडी शर्यती अड्डा…
RELATED ARTICLES